
अहमदनगर (दि.९ डिसेंबर):-श्रीगोंदा तालुक्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुण त्यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपीची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
पोलीस पथक श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाहिजे/फरार आरोपींची माहिती काढत असताना फरार आरोपी नामे अथर्व चौधरी व काळ्या पुर्ण नांव माहित नाही हे बेलवंडी फाटा या ठिकाणी दि.08 डिसेंबर 2023 रोजी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने बेलवंडी फाटा,ता.श्रीगोंदा या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले.त्यानंतर पोलीस पथकास बेलवंडी फाटा या ठिकाणी बातमीतील वर्णनाचे दोन संशयीत इसम आल्याचे दिसल्याने पोलीस पथक त्यांचेकडे जात असतांना त्यांनी पोलीस पथकास पाहुन तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1)अथर्व अनिल चौधरी रा. कोहकडी,ता.पारनेर,जि. अहमदनगर व 2) अक्षय उर्फ काळ्या नानासाहेब काळै रा. निमोण,ता.शिरुर,जि.पुणे असल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या वरील दोन्ही फरार आरोपींना श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 936/2023 भादवि कलम 395 या गुन्ह्याचे तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाणे हे करीत आहोत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोना/रविंद्र कर्डीले,फुरकान शेख,पोकॉ/रोहित मिसाळ,सागर ससाणे, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली आहे.