
अहमदनगर (दि.१७ नोव्हेंबर):-समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या युवा ख्रिस्ती आघाडी कडून येणाऱ्या नाताळ सणानिमित्त महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ब्र.राहुल वैराळ म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नाताळ सणानिमित गोरगरीब महिलांचा सन्मान करत साड्या वाटप केल्या यामुळे अत्यंत आनंद होत आहे.व या कार्यक्रमामुळे सर्व महिलावर्ग एकत्र येऊन देवाची प्रार्थना करतात.
या वेळी युवा ख्रिस्ती आघाडी चे संस्थापक अध्यक्ष ब्र.राहुल वैराळ,पास्टर अमान ओहळ,अनिल वाघमारे,गौरव घोरपडे,अनुग्रह वैराळ अनेक युवक व महिलांची उपस्थिती होती.