संविधानाचे रक्षण हीच काळाची गरज नाहीतर देशात अराजकता अनिवार्य लोकनेते राजुभाई साबळे
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे ७५ वा भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.वाय.सी. सभागृहात झालेल्या या भव्य सोहळ्यात संविधानाचे महत्त्व, लोकशाहीची मूलतत्त्वे आणि आजच्या राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य करत लोकनेते राजुभाई साबळे यांनी दिलेला इशारा विशेष ठरला.

२९ राज्ये,१० धर्म,७५०० जाती,३००० भाषा,हजारो संस्कृती,४५ कोटी कुटुंबे आणि १३७ कोटी लोकसंख्या यांना एकत्र बांधून ठेवणारा एकमेव मार्ग म्हणजे भारतीय संविधान असल्याचे प्रतिपादन लोकनेते साबळे यांनी केले.संविधान हे फक्त पुस्तक नाही,ते आपला श्वास आहे.लोकशाही टिकवायची असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये अंगीकारलीच पाहिजेत;अन्यथा अराजकता टळणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.कार्यक्रमाचे उद्घाटक,विधीतज्ञ अँड.अविनाश थिट्टे यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली.२०१४ पासून अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची दिशाभूल झाली.सरकार विरोधात बोलले की देशद्रोही ठरवणाऱ्या अशा ढोंगी सत्तेला जनता योग्य जागी बसवेल,असे मत थिट्टे यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिव–फुले–शाहू–आंबेडकर प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.सुरेश शिनगारे, दिनेश गवळे,सुनील खरात,जयनाथ बोर्डे,अर्शद लखपती आदींनी संविधान निर्भयपणे जपण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ रामेश्वर दळवी, रणजित मनोरे, प्रकाश घोरपडे, राजकुमार अमोलिक,भिमराव गाडेकर, प्रमोद देहडे, विजय सदावर्ते, दत्ता शिरसाठ, अनिल कांबळे, बाबर खान, हन्नुदादा, जाकेर जे. के. आदींची उपस्थिती होती.संचालन युवा शहराध्यक्ष शेख जहीर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप धनेधर यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारिणीने केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
