
अहमदनगर (दि.१८ डिसेंबर):-येथील प्रतिबिंब शिक्षण संस्थेच्या वतीने हौशी व फोटोग्राफीचा व्यवसाय करू इच्छणाऱ्यांसाठी बेसिक फोटोग्राफी कोर्स आयोजित करण्यात आला आहे या वर्गामध्ये कॅमेऱ्याची माहिती,प्रकाश योजना,कॅन्पोझीषण,अंगल,फोटो कसा घ्यावा शिकवून प्रात्यक्षिक करून घेण्यात येणार आहे.
छायाचित्रण हे एक करिअर आहे,या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, आपण आवश्यक कौशल्ये विकसित करणे महत्वाचे आहे.पण एक चांगला छायाचित्रकार बनण्यासाठी, फोटोग्राफीचे प्रशिक्षण, माहिती, समजून घेणे आवश्यक आहे.
फोटोग्राफी कोर्स एक महिन्याचा असून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे ज्यांना या वर्गात सहभागी सहभागी व्हायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी प्रतिबिंब संस्था,स्टेट बँक शेजारी ,दिल्लीगेट,नगर,व्हाट्सअप ९२८४९३०६७४ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.