
पुणे (प्रतिनिधी):-पुणे शिक्षण आयुक्तालय कार्यालय समोर विद्यार्थी फूटपाथवर उपोषण करत आहेत.ग्रामीण भागातील जवळपास दोन लाखांच्या वर विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की,
सरकारी शिक्षक भरती हे माध्यम विरहित असावे म्हणजेच Dated,Bed, इंग्लिश माध्यम असे नसावे, याने सर्वांना संधी मिळेल व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.रिक्त ६५ हजार शिक्षक भरती त्वरित करावी, परीक्षा फी नावाखाली घेतलेले ६५ कोटी रुपये विद्यार्थ्यांना परत करावे,सन २०१० पासून म्हणजेच २०१७ ला शिक्षक भरती झाली आहे परंतु अजूनही त्या लोकांना नियुक्ती दिली गेली नाही.महाराष्ट्रात मराठी माध्यमाला डावलून इंग्रजी माध्यमाला खाजगी संस्थाच्या हिताच्या दृष्टीने अधिक महत्व देण्याच्या उद्देशाने व शैक्षणिक आरक्षण तसेच नोकरीतील आरक्षण मोडीत काढण्याचा डाव या सरकारने आखलेला आहे.
शिक्षक भरती तरतुदी बाबतचा १३ ऑक्टोबर २०२३ चा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करून माध्यमात भेदभाव न करता गुणवत्ता आधारित शैक्षणिक धोरण सरकारने राबवावे अन्यथा आम आदमी पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शिक्षण आयुक्त यांना आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला.यावेळी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक आघाडी शहराध्यक्षा शितल कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन शिक्षण आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष अनिल कोंढाळकर, शेखर ढगे महासचिव,सतीश यादव,अमित मस्के,निरंजन आढागळे,शंकर थोरात,किरण कांबळे,पूजा वाघमारे,मनोज शेट्टी,नौशाद शेख,मिलिंद ओहळ,मिलिंद सरोदे,संदेश दिवेकर इत्यादी उपस्थित होते.