जनपरिवर्तन ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात साजरा-ॲड.लक्ष्मण बोरुडे
शेवगाव (प्रतिनिधी):- आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त २४ जानेवारी रोजी जिल्हापरिषद प्राथमिक केंद्र शाळा शास्त्रीनगर येथे जनपरिवर्तन ट्रस्ट यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन बाल गोपाळांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड.लक्ष्मण बोरुडे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या भाषणात वेळोवेळी केलेल्या शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या वाक्याची विद्यार्थ्यांना आठवण करून देत शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
यावेळी जिल्हापरिषद प्राथमिक केंद्र शाळा शास्त्रीनगर मुख्याध्यापिका वांढेकर मॅडम, जोशी सर,आल्हाट सर,सोनवणे सर,ढोले मॅडम,झिरपे मॅडम,चौधरी मॅडम,भापकर मॅडम, गायकवाड मॅडम,वडते मॅडम शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार सदस्य श्री.सनी शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जनरल मॅनेजर डॉ.सी.एम.पाटील यांनी केले.याप्रसंगी संस्थेच्या वतीने शाळेला शुभेच्छा देण्यात आल्या व बाळ गोपाळ विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या वतीने बोडखे सर यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले.