अहमदनगर (दि.२४ जानेवारी):-नगर शहरातील व्यापाऱ्याने बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रोख रक्कम लंपास करणारा आरोपीस 9 लाख 41,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह 24 तासाचे आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.23 जानेवारी रोजी यातील फिर्यादी श्री.प्रताप प्रेमचंद इर्दवानी (रा.सुरभी हॉस्पीटल समोर,गुलमोहोर रोड,अहमदनगर) यांचे महाराष्ट्र ट्रेडर्स नावाच्या दुकानामध्ये काम करणारा सुशिल प्रकाश बिरादार (रा. वाणीनगर) याचेकडे बँक खात्यामध्ये भरणा करण्यासाठी 10,00,000/- लाख रुपये रोख रक्कम दिली होती.सुशिल बिरादार याने त्याचे ताब्यातील रोख रक्कम बँकेमध्ये न भरता रोख रक्कम घेवुन पळुन गेला होता.या घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. 79/2024 भादवि कलम 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आरोपीस अटक करुन रोख रक्कम हस्तगत करणेबाबत आदेशित केलेले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन आरोपीस अटक करुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना दिल्या.सदर सुचना प्रमाणे पथकाने आरोपीचे वास्तव्याची माहिती काढली असता आरोपी हा बिदर, कर्नाटक येथील राहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली.त्यानुसार पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेणेकामी बिदर,कर्नाटक येथे जात असतांना पथकास सदर आरोपी हा मोहोळ बस स्टँड, जि.सोलापुर या ठिकाणी थांबलेला असल्याची व तो तेथुन कर्नाटक येथे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार पोलीस पथकाने मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांची मदत घेवुन मोहोळ बस स्टँड या ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेत असतांना आरोपीहा बसची वाट पाहत असतांना बस स्टँडवर मिळुन आला.त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे असलेल्या काळे रंगाचे सॅकमध्ये गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी 9,41,000/- रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असे मिळुन आले.आरोपी यास पुढील तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे हे करीत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलिस श्री.राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.हरिष खेडकर पोलीस उपअधीक्षक मुख्यालय अति.कार्यभार नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,पोहेकॉ/संदीप पवार,पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से,फुरकान शेख, संतोष खैरे,पोकॉ/अमृत आढाव,प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.