पारनेर प्रतिनिधी (दि.२४ जानेवारी):-नगर कल्याण महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे-मेहकर एस.टी.बस आणि चारचाकी इको गाडी यांचा ढवळपुरी फाटया नजीक बुधवारी पहाटे मध्यरात्री २.३० वाजता भिषण आपघात झाला असून यात ६ जण जागीच ठार झाले.
पाच मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ व त्यांची टिम घटनास्थळी दाखल झाली असून अपघात ग्रस्ताना तातडीने मदत करण्यात आली.आपघात ग्रस्त वाहने बाजुला केली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.दरम्यान अपघात ग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.