Maharashtra247

नायगाव जुने शाळेचे शिक्षक संतोष वाघमोडे यांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर (ॲड.प्रशांत राशिनकर):-श्रीरामपूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेचे उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना संगमनेर इनरव्हील क्लबच्या वतीने यावर्षीचा राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार महाराष्ट्र राज्य नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,मयूर ज्वेलर्सचे प्रमुख महेश मयूर,क्लबच्या प्रकल्प प्रमुख सौ.वृषालीताई कडलग,अध्यक्षा सौ.सुनिता गाडे,सचिव सौ.शिल्पा नावंदर आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संतोष वाघमोडे यांनी शाळेतील शिक्षक,विद्यार्थी,ग्रामस्थ व पालकांच्या मदतीने नायगाव जुने प्राथमिक शाळेत विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत.शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धेत केंद्रस्तरीय तसेच तालुका पातळीपर्यंत चमकले आहेत.या अगोदरही त्यांनी कारवाडी (ता.नेवासा),कुरणपूर,नायगाव नवे (ता.श्रीरामपूर) या शाळांमध्येही उल्लेखनीय काम केलेले आहे.त्यांचे विद्यार्थी जिल्हा पातळीपर्यंत स्पर्धेतही चमकले आहेत.

विद्यार्थी गुणवत्तेला प्राधान्य देऊन लोकसहभागातून त्यांनी गेल्या चार वर्षात नायगाव जुने प्राथमिक शाळेत विद्यार्थी गुणवत्तेबरोबर शाळेच्या भौतिक बाबी पूर्ण करण्याचाही प्रयत्न केला आहे.लोकसहभागातून बोलक्या भिंती बनविणे (बाला उपक्रम),शाळेची रंगरंगोटी,स्मार्ट टी.व्ही,स्टेजचे बांधकाम,किचन शेडचे योग्य जागेवर शिफ्टींग,मुलांसाठी चप्पल स्टँड,पेपर स्टँड,वाचनालयासाठी पुस्तके,ऑफिस कपाट,सर्व मुलांना स्पोर्ट ड्रेस,बडोदा बँकेतर्फे सर्व मुलांना स्कूल बॅग,ऑफिस कपाट,राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा,खुर्च्या व रॅक खरेदी,विद्यार्थी सप्तरंगी परिपाठ,स्पर्धा परीक्षेची तयारी,इंग्रजी विषयासाठी विशेष उपक्रम,विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन,वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा,योगासने व कवायत,महिला व पालक मेळावे,आजी- आजोबा मेळावा,आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालक जागृती,शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप, विद्यार्थी वाढदिवस,ग्रामपंचायत च्या माध्यमातून मुलांसाठी नवीन शौचालय,वर्गखोली भिंत दुरुस्ती,विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅण्ड वॉश स्टेशन उपलब्ध केले आहे.या बाबींमुळे शाळेचा कायापालट झाला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल नायगाव जनसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष लांडे पाटील,बाळकृष्ण भोसले पाटील,बी.के.राशिनकर, बाबासाहेब राशिनकर पा.,साईनाथ लांडे पाटील,अरुण राशिनकर पा,कैलास राशिनकर पा.,विजय त्रिभुवन,बापूसाहेब लांडे, ॲड.प्रशांत राशिनकर व समस्त ग्रामस्थ नायगाव यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page