अहमदनगर (दि.२३ जानेवारी):-चोरीस गेलेले ३१ हजारांचे मोबाईल फोन फिर्यादीस कोतवाली पोलीसांनी नुकतीच परत करण्याची कामगिरी केली आहे.यातील फिर्यादी संतोष जानराव शिंदे (रा.समाधान हॉटेल समोर,नगर दौंड रोडअहमदनगर) यांनी फिर्याद दिली की ते त्यांचे राहते घरी झोपले अस्तांना एका अज्ञात इसमाने त्यांचा साक्षीदार उमेश शिंदे याचा मोबाईल फोन चोरी करून घेऊन गेला आहे.
त्या प्रमाणे दिलेल्या फियादी वरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं I ७३/२०२४ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी अमलदारांना तपास करून हा गुन्हा उघडकीस आणण्यास आदेशित केले होते.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अंमलदारांनी तपास केला असता सचिन सुभाष दाते (रा.आशिर्वाद कॉलनी सारसनगर मूळ रा. घोडेगांव रोड,मोरदेवाडी मंचर.ता.आंबेगाव जि.पुणे) याने केला आहे असे तपासात निष्पन्न झाले.आरोपींचा शिताफीने शोध घेऊन आरोपी याचे कडुन फिर्यादी व साक्षीदार यांचे ४ मोबाईल फोन व वापरत असलेली मो. सायकल हिरो होडा स्लेंडर अशी एकुण ३१,०००/- रु.किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.या गुन्हयाचा तपास पोहेकॉ/वाघ हे करीत आहेत.
हि कारवाई पोलीस. जिल्हा अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अथिकारी श्री.हरिष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे ,सपोउपनिरी/राजेंद्र गर्गे,पोहेकॉ/गाडीलकर, पोहेकॉ/शाहीद शेख,पोहेकॉ/ सागर पालवे,पोना/योगेश कवास्टे,पोकॉ,दिपक रोहकले, पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/ सत्यजित शिंदे,पोकॉ/सुरज कदम,पोकॉ/शिवाजी मोरे, पोकॉ/अतुल काजळे,पोकॉ/सोमनाथ केकान,पोकॉ/अशोक कांबळे,पोकॉ/राजेंद्र पालवे,पोकॉ/महेश पवार यांनी केली आहे.