अहमदनगर (दि.२३ जानेवारी):-अहमदनगर शहर व श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणारे 2 सराईत आरोपीना तब्बल 15 लाख 07,000/-रुपये किंमतीच्या 22.2 तोळे (222 ग्रॅम) वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्री. प्रशांत पुरुषोत्तम शर्मा (रा.श्रीकृष्ण नगर,एकविरा चौक अहमदनगर) हे दि.14 जानेवारी रोजी पत्नीसह मोटार सायकलवर रस्त्याने जाताना काळे रंगाचे जर्किन व डोक्यात टोपी घातलेले अनोळखी 2 इसम काळे रंगाचे विना नंबर पल्सर मोटार सायकलवर येवुन फिर्यादी यांचे पत्नीचे गळ्यातील 52,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन घेवुन गेले बाबत तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 61/2024 भादविक 392, 34 प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.
अहमदनगर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधा करीता पथक नेमुण जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पथकाने अहमदनगर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी नामे गणेश आव्हाड रा.नागापुर व सागर नागपुरे रा.सावतानगर भिंगार यांचेवर संशय बळावल्याने त्यांचा शोध घेत असतांना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत दोन्ही आरोपी काळे रंगाचे विना नंबर पल्सर मोटार सायकलवर भिस्तबाग परिसरात फिरत आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने लागलीच भिस्तबाग येथे जावुन,सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे दोन्ही संशयीत आरोपी काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन येताना दिसले.पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करुन थांबविले.
त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात सोन्याचे दागिने व 1 काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल मिळुन आल्याने त्याबाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर व लोणी परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने आसल्याची माहिती दिली.त्यावरुन अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे 12 गुन्हे उघडकिस आले आहेत.12 गुन्ह्यात चोरीस गेलेले 13,32,000/- 222 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,50,000/- रुपये किंमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल व 25,000/- रुपये किंमतीचे 2 मोबाईल फोन असा एकुण 15,07,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींचे ताब्यात मिळुन आल्याने दोन्ही आरोपींना तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 61/24 भादविक 392,34 या गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
दोन्ही आरोपी अत्यंत सराईत असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे व श्रीमती.स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर,श्रीरामपूर व शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/संदीप पवार, मनोहर गोसावी,पोना/रविंद्र कर्डीले,देवेंद्र शेलार,विशाल गवांदे,पोना/संतोष खैरे, फुरकान शेख,पोकॉ/शिवाजी ढाकणे,रणजित जाधव, आकाश काळे,अमृत आढाव व मेघराज कोल्हे यांनी केली आहे.