
अहमदनगर (दि.२२ जानेवारी):-मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोहोचणार आहे या मोर्च्याचे आज साेमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी अहमदनगरमधून मुंबईच्या दिशेने प्रस्थान होत आहे.
दरम्यान नगरमध्ये या पदयात्रेचे आर.पी.आय (आंबेडकर) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड,युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे,आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या शेकडो भीमसैकांनी शहरातील मार्केटयार्ड समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर स्वागत केले.यावेळी आर.पी.आय (आंबेडकर )पक्षाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देऊन घोषणा देण्यात आल्या.
यांनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहराचे लाडके आमदार संग्रामभैय्या जगताप उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे तसेच बौद्धाचार्य संजय कांबळे,शंकर पंडित,जय कदम,शहराध्यक्ष हरीश अल्हाट,आकाश कदम,अक्षय कदम इ.उपस्थित होते