मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मोहटादेवी देवी सार्वजनिक न्यास,मोहटे (ता. पाथर्डी) येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले विश्वस्त निवडीवरील वाद, तक्रारी व प्रशासनाशी सुरू असलेल्या संवादानंतर अखेर नवीन विश्वस्त मंडळाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांनी नियमावली कलम 2(ब)(क) अंतर्गत विश्वस्तांची नियुक्ती करत ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे आदेश 29 नोव्हेंबर रोजी जारी केले.नवीन विश्वस्त मंडळात नियमाप्रमाणे गावातील ५ आणि बाहेरच्या ५ अशा एकूण १० विश्वस्तांचा समावेश करण्यात आला आहे. गावकऱ्यांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या मतभेदांचा विचार करून, प्रशासनाने पारदर्शकता राखत सर्व पात्र नावांचा विचार करून ही यादी जाहीर केली आहे.

📌 मोहटे गावातील नियुक्त विश्वस्त :
श्री. बाळासाहेब सखाराम दहिफळे
श्री. शुभम शामराव दहिफळे
श्री. शशिकांत रामलाल दहिफळे
श्री. अशोक भगवान दहिफळे
श्री. राजेंद्र विठ्ठलराव शिंदे
📌 बाहेरील नियुक्त विश्वस्त :
ॲड.विक्रम लक्ष्मणराव वाडेकर, अहमदनगर – फेरनियुक्ती
श्री. कैलास कांड,जालना
श्री. प्रसन्न साईबाबा डाळे, पुणे
श्री. श्रीकांत शिवकुमार लहोटे, पाथर्डी
श्रीमती ऋतुजा अशोक काळे, पाथर्डी
नवीन विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ 29/11/2024 पासून 28/11/2027 पर्यंत असेल. नियुक्त विश्वस्तांनी तात्काळ कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.मोहटादेवी संस्थान हे जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक केंद्र असून, येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधा, मंदिर व्यवस्थापन व विकासकामांसाठी नव्या विश्वस्त मंडळाची निवड महत्त्वाची मानली जाते. गावातील व बाहेरच्या सदस्यांचा समतोल राखत करण्यात आलेली ही नियुक्ती संस्थेच्या उत्तम प्रशासनाला चालना देणारी ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
