अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
अंबरनाथ (प्रतिनिधी):-अंबरनाथ महालक्ष्मी नगर प्रभाग क्र.२५ मध्ये विकासाच्या कामातून स्वतःची खास ओळख निर्माण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या भाजपा शक्ति केंद्रप्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी आगामी निवडणुकीत रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील काही महिन्यांत प्रभागातील स्वच्छता मोहिमा, नाली दुरुस्ती,चायनल गटारे, पाणीपुरवठा सुधारणा, धूरफवारणी,कीटकनाशक फवारणी,वीज-सुविधांची दुरुस्ती अशी अनेक कामे सातत्याने पूर्ण करून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.“मी नाही बोलत..माझं काम बोलतं” या दमदार भूमिकेसह स्वप्नाली संतोष शिंदे यांनी प्रभागातील महिलांसाठी हेल्पडेस्क, नागरिकांसाठी आधार केंद्र, पावसाळी तयारी,सार्वजनिक सुविधांचे उन्नतीकरण अशा उपक्रमांमुळे महालक्ष्मी नगर परिसरात विकासाची नवी दिशा दाखवली आहे.
नागरिकांच्या छोट्या–मोठ्या अडचणींवर तातडीने प्रतिसाद देणे,क्षेत्रातील समस्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न,आणि सतत जनसंपर्क ठेवणे या गुणांमुळे त्यांना प्रभागातील महिला व युवकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.नागरिकांशी संवाद साधताना शिंदे म्हणाल्या- “सेवा हीच माझी ताकद…आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय.महालक्ष्मी नगराला स्वच्छ,सुरक्षित आणि आधुनिक बनवण्याचा निर्धार घेऊनच मी मैदानात उतरतेय.”आगामी निवडणुकीत कमळ चिन्हावर मत देऊन विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
