“जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांसाठी नवा पर्याय म्हणून सामाजिक कार्यकर्त्या जयश्री (ताई) रवींद्र टकले यांनी महानगरपालिका निवडणुकीतून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.दीर्घकाळापासून सामाजिक कार्य,महिला सक्षमीकरण,परिसरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आलेल्या जयश्रीताईंनी यंदाच्या निवडणुकीत प्रभाग १६ च्या विकासाचा ‘नवा अध्याय’ सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.जयश्रीताई टकले यांनी शिक्षण,आरोग्य,पाणीपुरवठा, स्वच्छता व महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. गत अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत,विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि नागरी हक्कांसाठी जनजागृती यांसारखी कामे केल्यामुळे त्या प्रभागातील अनेक महिलांमध्ये व युवकांमध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत.प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना जयश्रीताईंनी म्हटले की, “जनतेचा हक्क, जनतेसाठी काम आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य हीच माझी प्राथमिकता आहे.
प्रभाग १६ चा सर्वांगीण विकास हा माझा मुख्य ध्यास राहणार आहे.”अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय वातावरण तापत असून जयश्रीताई टकले यांच्या इच्छुक उमेदवारीमुळे नागरिकांमध्ये नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे.
