आरपीएम कला अकादमीचा करा ‘ ओके जल्लोष’..! छत्रपती संभाजीनगरात हिंदी–मराठी सुरांची भव्य मेजवानी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- शहरातील आरपीएम कला अकादमीच्या वतीने आयोजित ‘जिंदगी इम्तिहान लेती हैं’ या हिंदी गाण्यांच्या कराओके-शोने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संगीतप्रेमींना एका अविस्मरणीय सुरेल वातावरणाची मेजवानी दिली. मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडलेल्या या कार्यक्रमाने नवोदित कलाकारांना आपल्या गायनकौशल्याची चमक दाखवण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरपीएम कला अकादमीचे संस्थापक आणि लोकनेते राजुभाई साबळे, अकादमीचे जिल्हाध्यक्ष शेख रशीदभाई, संजय पांडव, अल्ताफ शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे, सुनिल खरात, अर्शद लखपती, प्रकाश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.कराओके शोचे आयोजक एस. के. ताहीर, दिग्दर्शन सलीम पठाण, संकल्पना एस. डी. मुझफर, तर व्यवस्थापन जाकेर सौदागर यांनी उत्कृष्टपणे सांभाळले.कार्यक्रमात शहरातील अनेक संगीत रसिकांनी सहभाग घेत, जुन्या–नव्या हिंदी व मराठी गीतांची अप्रतिम सादरीकरणे सादर केली. कराओके ट्रॅकवर गाताना प्रत्येक कलाकाराचा आत्मविश्वास, आवाजातील ताकद आणि सादरीकरणातील भावनांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. सभागृहभर टाळ्यांचा गजर सुरूच होता.
संगीतमय मैफलीत सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मनापासून साथ दिली. उत्साह, आनंद आणि सुरावट यांनी सजलेल्या या शोने शहरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या शेवटी आरपीएम कला अकादमीच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.या वेळी संस्थापक अध्यक्ष लोकनेते राजुभाई साबळे म्हणाले,“नवोदित आणि सुप्त कलागुणांना मोठे व्यासपीठ मिळावे हा आमचा उद्देश आहे. संगीत ही आत्म्याला जोडणारी कला आहे आणि तिची जपणूक करणे ही आमची जबाबदारी आहे.”कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अकादमीचे कार्याध्यक्ष शेख रऊफभाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन सलीम पठाण यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकादमीच्या संपूर्ण टीमने परिश्रमांची पराकाष्ठा केली.
