नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर आद्यनृत्यांगणा पवळा जन्मभूमी दिशादर्शक फलकाचे उद्घाटन उत्साहात संपन्न..हिवरगाव पावसा ग्रामपंचायतच्या स्तुत्य उपक्रमातून महान कलावंताचा सन्मान
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- एकोणिसाव्या शतकात स्त्रीया कला क्षेत्रात काम करत नव्हत्या. त्या काळात आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांनी मोठ्या धाडसाने स्टेजवर पाऊल ठेवून महाराष्ट्रभर लावण्या सादर केल्या.त्या काळात पुरुषप्रधान संस्कृती व वर्ग व्यवस्थेचा पगडा होता.सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती,आशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन विषमतावादी व्यवस्थेला ठोकर मारून नामचंद पवळा यांनी तमाशा क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले.त्यांनी पठ्ठे बापूराव यांच्या बरोबर महाराष्ट्रभर सर्वत्र वगनाट्य, लावण्या सादर केल्या.छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील राजदरबारा मध्ये मिठाराणीचे वगनाट्य पवळा भालेराव व पट्टे बापूराव यांनी सादर केले आहे.महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.महिलांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला.कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे नामचंद पवळा यांचा महाराष्ट्र शासनाने सन 2022 मध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्काराला नाव देऊन सन्मान केला आहे.
नामचंद पवळा या अद्वितीय व्यक्तिमत्व आहे.यांच्या कला क्षेत्रातील अतुलनीय योगदाना मुळे हिवरगाव पावसा गावचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे. हिवरगावकरांसाठी ही बाब भूषणावह असल्याने आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा यांची जन्मभूमी दिशादर्शक फलक नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग येथे लावण्याचा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत निर्णय घेतला.त्यानुसार आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांची जन्मभूमी दिशादर्शक फलकाचे उद्घाटन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सरपंच सुभाष गडाख,भाजपाचे जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,माजी मुख्याध्यापक रघुनाथ भालेराव,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,विविध कार्यकरी सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,ग्रामसेवक हरिष गडाख,भाजपाचे तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,शिवसेना शिंदे मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भालेराव, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे, प्रा.बाबुराव पावसे,सामाजिक कार्यकर्ते केशव दवंगे,संस्थेच्या सचिव नितीनचंद्र भालेराव,सिताराम गडाख गुरुजी,डॉ.पवनकुमार गायकवाड,शैला भालेराव, यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत फलकाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
माजी मुख्याध्यापक रघुनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा यांची जन्मभूमी दिशादर्शक फलक नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग येथे लावण्याचा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत निर्णय घेतला त्याबद्दल हिवरगाव पावसा ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.फलक अनावरण प्रसंगी आद्यनृत्यांगणा पवळा यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव यांनी ग्रामसभेत पवळा यांच्या जन्मभूमी दिशादर्शक फलकाचा ठराव शिवसेना शिंदे मागासवर्गीय सेलचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव मांडला.त्यानंतर आद्यनृत्यांगणा पवळा जन्मभूमी दिशादर्शक फलक लावून ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांनी महान कलावंताचा मोठा सन्मान केला आहे.त्याबद्दल सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,ग्रामविकास अधिकारी हरीश गडाख व सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ यांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब भालेराव,संजय भालेराव,सुयोग भालेराव,बच्चन भालेराव,राजेंद्र दारोळे,प्रल्हाद मोकळ,सोमा पावसे,संजय वाकचौरे,विलास कदम,बाबासाहेब कदम,प्रवीण गडाख विकास दरोळे,शरद मोकळ, दत्तात्रय पावसे यांच्यासह कला सम्राज्ञी पवळा कला मंच, भीमशक्ती तरुण मित्र मंडळ,बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थी व हिवरगाव पावसा ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.
