प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच भारतीय जनता पक्षाच्या तर्फे सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविता निलेश घोडतुरे यांनी अधिकृतपणे मैदानात उतरताच प्रभागात नवीन ऊर्जेची लाट उसळली आहे. समाजकार्यातून घडलेले व्यक्तिमत्त्व,सर्वसामान्यांचा विश्वास आणि क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरी यांच्या जोरावर त्यांनी स्थानिकांचा आत्मीय आधार मिळवण्यास सुरुवात केली आहे.

“प्रभागाचा विकास हाच माझं सर्वस्व” सविता घोडतुरे
पोम्प्लेटद्वारे जनतेशी संवाद साधताना सविता घोडतुरे म्हणतात,”समाजकारण हा माझा श्वास व ध्यास आहे. जनतेची सेवा करण्यासाठी मी प्रभाग 10 मधून निवडणूक लढवत आहे. माझा निर्णय केवळ पदासाठी नाही, तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.”कोरोना काळातील कठीण परिस्थितीत भाजपाच्या माध्यमातून त्यांनी केलेली सेवा, नागरिकांना दिलासा देण्यासाठी केलेले प्रयत्न, महिला व दुर्बल घटकांसाठी केलेली धडपड आजही स्थानिकांना लक्षात आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होताच प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
विकासकामांचा भक्कम पाया मंत्री अतुलसाहेब सावे यांचे पाठबळ
राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.श्री. अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि प्रभागात मोठ्या प्रमाणावर झालेले विकासकामांचे श्रेय स्थानिकांना मिळालेल्या सुविधा व नवसंजीवनीतून दिसून येते.त्यात चौकांचे लाईटिंग,रस्त्यांची मजबूतीकरण,सामाजिक सभागृह,शाळेसाठी इमारत,A.V. केबल,जलसंधारण,विविध नागरी सुविधा या सर्वांचा समावेश आहे. प्रभागातील नागरिकांना हे सर्व विकसित भविष्य दाखवणारे कार्य पुढील काळात अधिक वेगात होईल,असा विश्वास घोडतुरेंनी व्यक्त केला आहे.
“माझी ताकद म्हणजे तुमचा विश्वास” सविता घोडतुरे
सविता घोडतुरे गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.महिलांच्या समस्या,आरोग्य,स्वच्छता, वयोवृद्धांची काळजी,स्थानिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, तसेच नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची क्षमता यामुळे त्यांनी मजबूत जनाधार मिळवला आहे.त्या पुढे म्हणतात,“मी कुठल्याही गट-तटात नाही. प्रभागातील प्रत्येक नागरिक माझा परिवार आहे. ला संधी दिल्यास विकासाची नवी वाट मी प्रभागासाठी उघडेन.”
भाजपाचा मजबूत किल्ला महिला नेतृत्वाला प्राधान्य
मोदी-शहा यांचे नेतृत्व, पक्षाची संघटनात्मक पकड आणि स्थानिक पातळीवरील जेष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन यांच्या बळावर प्रभाग 10 मध्ये भाजपाचा प्रभाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर महिला नेतृत्वाला मिळालेली संधी म्हणजे भाजपाचा ‘सबका साथ-सबका विकास’ या धोरणाचा प्रत्यय आहे.सविता घोडतुरे यांच्या उमेदवारीने प्रभाग 10 मधील लढत अधिकच रंगतदार झाली असून लोकाभिमुख काम, स्पष्ट धोरणे, प्रामाणिक सेवा आणि विकासाचा ठाम रोडमॅप यांच्या जोरावर त्या मतदारांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. आगामी दिवसात त्यांच्या प्रचाराला अधिक वेग येणार असून प्रभागातील नागरिक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
