एमआयडीसी पोलिसांचा गोमांस तस्करीवर छापा..२०० किलो गोमांससह आरोपी जाळ्यात!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):–एमआय़डीसी पोलिसांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करून विक्री करणाऱ्या विरोधात केलेल्या कारवाईत तब्बल २०० किलो गोमांस जप्त करत एक आरोपीला ताब्यात घेतले.ही मोठी कारवाई दि.२२/११/२०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता करण्यात आली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग शिरीष वमने, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,पोलीस उपनिरीक्षक मनोज मोढे,पोलीस अंमलदार आदिनाथ पालवे,सुशांत दिवटे,ज्ञानेश्वर तांदळे,शुभम सुद्रुक,सुरज देशमुख यांनी केली आहे.
