यवतमाळमध्ये राजकीय वादळ..प्रभाग क्र.१४ मधून पल्लवी शांता विठ्ठल रामटेके यांचे दमदार रणांगणात आगमन.. जनआक्रोश,विकास आणि परिवर्तनाचा नवा संकल्प..!
यवतमाळ (प्रतिनिधी):-यवतमाळ मधील प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणुकीची हवा चांगलीच तापली असून या प्रभागातील अनुसूचित जातीच्या उमेदवार पल्लवी शांता विठ्ठल रामटेके यांच्या दमदार प्रवेशाने राजकीय समीकरणे मोठ्या वेगाने बदलू लागली आहेत.

सामाजिक बांधिलकी,प्रभागातील प्रश्नांची जाण आणि तळागाळातील प्रत्येक नागरिकाशी असलेला सखोल संपर्क यामुळे पल्लवी रामटेके यांना प्रभागात मोठा लोकसमर्थन मिळताना दिसत आहे.प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाणीपुरवठा,रस्ते,स्वच्छता, नाली सुधारणा, नागरिकांना मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकास या मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून प्रश्न कायम आहेत.या सर्व समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचा निर्धार करत पल्लवी शांता विठ्ठल रामटेके यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सर्वसामान्य मतदारांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी केलेल्या कामांचा ठसा स्पष्टपणे दिसत असल्याने महिलांसह युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. अनुसूचित जातीतील मागासलेल्या घटकांसाठी केलेले त्यांचे निरंतर प्रयत्न, शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवरील त्यांची संघर्षशील भूमिका आणि जनतेशी सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज सादर होताच प्रभागात उत्साहाची लाट उसळली.पल्लवी रामटेके या “विकासासाठी लढणारी आणि जनतेच्या हक्कासाठी ठाम उभी राहणारी उमेदवार” अशी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाल्या असून आगामी निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक 14 मधील एक महत्त्वाची आणि प्रभावी उमेदवार ठरत आहेत.प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा, तोंडी प्रचारातील जोरदार प्रतिसाद आणि सामाजिक माध्यमांद्वारे होणारी त्यांच्या कामांची दखल — यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील या निवडणुकीत पल्लवी शांता विठ्ठल रामटेके या परिवर्तनाची नांदी ठरत असून प्रभाग 14 मध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
