
अहमदनगर (दि.२ फेब्रुवारी):-श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ खुन प्रकरणातील पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी,आरोपी प्रियकरासह ६ आरोपींना पुणे येथुन शिताफीने जेरबंद करण्यात आले आहे.
या घटनेतील बातमीची हकिगत अशी की,दि.30 जानेवारी रोजी घटनेतील फिर्यादी आरती योगेश शेळके (रा.कोथुळ,ता. श्रीगोंदा) यांच्या राहते घरात अनोळखी ४ इसमांनी प्रवेश करुन फिर्यादीचे पती मयत योगेश सुभाष शेळके हे झोपलेले असताना त्यांचे गळ्यावर, हातावर,उजव्या पायावर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत करुन जिवे ठार केले तसेच फिर्यादीचे गळ्यास कोयता लावुन आरडा ओरडा केल्यास जिवे मारण्याची धमकी दिले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 37/2024 भादविक 302, 452, 506,34 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हि घटना गंभीर स्वरुपाची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे २ विशेष पथके तयार करुन ना उघड गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवून पथके रवाना केली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पहाणी करुन आजु बाजूला विचारपुस केली असता घटनाक्रम पहाता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता.परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याचे सोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले होते.
फिर्यादी पत्नी आरती हिनेपण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगुन पथकाची दिशाभुल केली होती.तरीही पथकाला घटनेचे सत्यतेबाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपीं बाबत खात्री पटत नव्हती.म्हणुन साधारण दोन दिवस कोथुळ गावातुन माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणा दरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहीत साहेबराव लाटे रा.कोथुळ, हल्ली मुक्काम पुणे याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसुन आला. त्या प्रमाणे पथकाने पुणे येथे जावुन रोहीत लाटे याला विश्वासात घेवुन त्याचे कडे विचारपुस केली.त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध होते. त्यावरुन मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागिल १५ दिवसा पुर्वी पासुन नियोजन करुन अनिश सुरेंद्र धडे याचे मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे, विराज सतिष गाडे,शोएब महमंद बादशाह व आयुष शंभु सिंह यांना दिड लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यांचे मदतीने २ मोटार सायकलवर त्यांचेसह येवुन खुन केल्याचे सांगितले.
तसेच रोहीत व आरती यांचे तील संबंधाची कोणाला माहिती मिळु नये म्हणुन स्नॅपचॅट या सोशल मिडीया ऍ़पचा वापर करुन ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते. वर नमुद आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना विविध ठिकाणावरुन ताब्यात घेतले.पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहेत.अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या राहुरी येथील वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन व कोथुळ,ता.श्रीगोंदा येथील प्रेम प्रकरणातुन सुपारी देवुन झालेला खुन अशी दोन्ही प्रकरणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संवेदनशिलरित्या हाताळुन दोन्ही गुन्हे उघडकिस आणल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना 35,000/- रुपये रोख बक्षिस जाहिर केले.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस व श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, सफौ/बबन मखरे,पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे,रविंद्र कर्डीले,पोना/फुरकान शेख, पोकॉ/रविंद्र घुगांसे,मच्छिंद्र बर्डे,अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे,रोहित मिसाळ,मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड,अतुल लोटके, गणेश भिंगारदे,देवेंद्र शेलार, आकाश काळे,मपोना/भाग्यश्री भिटे,सोनाली साठे, ज्योती शिंदे,चासफौ/उमाकांत गावडे,चापोहेकॉ/संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांनी केलेली आहे.