Maharashtra247

शेवराईंच्या कार्याचा धडा तरुणाईला प्रेरणादायी ठरेल-निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे;शेवराई सेवाभावी संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मतदान जनजागृती कार्यक्रमात वोटींग कार्ड,रेशनिंग कार्ड,जातीचे दाखले घरपोहच

पुणे (सुनील भोसले):- शेवराई सेवाभावी संस्थेच्या वतीने नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून कै.ज्ञानदेव भोसले आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमानित्ताने पुणे जिल्ह्यातील ३ लाख पारधी व भिल्ल समाजाला मतदान जनजागृतीवर हर घर ओटींग कार्ड याची जन जागृती कार्यक्रमामध्ये सात हजार ओटींग कार्ड,चौदाशे रेशनिंग कार्ड,आणि तिन हजार जातीचे दाखले गरीब आदिवासींच्या घरपोहच हा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी निवडणूक आयुक्त श्रीकांतजी देशपांडे यांच्या हस्ते आदर्श माता शेवराबाई भोसले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते म्हणाले की अशा आदर्श मातामुळे देशाचे नाव उंचावते,ज्यांनी स्वतःचे सर्व सुख त्यागुन शेवराईंच्या कार्याचा धडा तरुणाईला पुढे प्रेरणादायी ठरेल.यावेळी हवेली तालुक्यातील नायगाव व ऊरुळी कांचन भोसले वस्ती,टिळेकर वाडी खामगाव टेक,शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमडरे येथे आणि इंदापुर तालुक्यातील तक्रार वाडी येथे निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे व आदिवासी समाजसेवक यांच्या हस्ते आदिवासी फासे पारधी व भिल समाजाला ओटींग कार्ड,रेशनिंग कार्ड,जातीचा दाखले,जागा पट्टे सातबारा , उत्पन्नाचा दाखले वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे हे आदर्श माता शेवराबाई भोसले व त्यांच्या कुटुंबाच्या दु:खामध्ये सहभागी झाले होते.त्यांनी आपल्या दौऱ्यानिमित्त हवेली तालुक्यातील नायगाव,ऊरुळी कांचन,शिरुर, इंदापुर येथे कार्यक्रमामध्ये यांनी प्रमुख पाहुणे म्हणून नागरिकांना मार्गदर्शन केले.श्रीकांत देशपांडे अप्पर मुख्यसचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी पारधी वस्ती गाव भेट देऊन या समाजाचे दुःख जाणून घेतले ते महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यादाच भेट देणार कर्तव्यदक्ष अधिकारी ठरले.

पारधी समाजाच्या समस्या व उपाय तसेच प्रत्येक मतदानाचे महत्त्व काय आहे हे पारधी समाजास पटवून दिले व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना काही सूचना दिल्या.तसेच ज्या पारधी बांधवांना वेगळ्या नजरेन पाहिले जात होते,अशा कुटुंबासाठी विशेष लक्ष देवून पारधी समाजातील जेष्ठ समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाजातील तरुणांना मासेमारी व्यवसायामध्ये आणले व बोटिंग व्यवसाय,शेळी पालण,शेतीमध्ये रोजंदारी,असे व्यवसायात आणले.

त्यामध्ये ते आपली उपजीविका कशी भागवतात याची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले.या वेळी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे,जेष्ठ आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले,हवेलीचे उपविभागीय दंडाधिकारी संजय आसवले,शिरुरच्या प्रांत देवकाते मॅडम,बारामतीचे प्रांत वैभव नारवडकर,आदर्श माता शेवराबाई भोसले,हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे,शिरुरचे तहसिलदार म्हेत्रे, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील,तसेच जिल्हातील नायब तहसिलदार,मंडलअधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,आणि जेष्ट लेखक पत्रकार भास्कर भोसले,मा.सरपंच राजेंद्र चौधरी,नायगावचे ग्रामस्थ,ऊरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन,व ऊरुळी कांचन ग्रामस्थ,तुकाराम भोसले,राजेंद्र टिळेकर,बाळासाहेब चौरे,राजेंद्र टिळेकर,टिळेकर वाडी,भवरापुर,तळेगाव ढंमडरे ग्रामस्थ,इंदापुर तालुक्यातील तक्रारवाडी सरपंच व ग्रामस्थ,नायब तहसीलदार,सर्कल,तलाठी इ.उपस्थित होते.

You cannot copy content of this page