Maharashtra247

क्लेरा ब्रुस बॉईज हायस्कूल ग्राऊंडवर गांजा पिणारे चौघे ताब्यात कोतवाली पोलिसांची कारवाई;कोतवालीत एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल

अहमदनगर (दि.१५ फेब्रुवारी):-शहरातील क्लेरा ब्रुस बॉईज हायस्कूल ग्राऊंड,कोठी येथे रात्रीच्या वेळी काही इसम गांजा सेवन करीत असतात.अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले.गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी गेले असता तेथे इसम नामे अमोल प्रदिप कदम,योगेश राम सटाले,अनिकेत शंकर वाकळे,सोमनाथ राजु केदारे हे चार जण शरीराला हानिकारक असणारा अंमली पदार्थ गांजा पिताना आढळले.

पोलिस पथकाने त्यांना त्यांना ताब्यात घेऊन त्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात वरील चारही इसमांनी गांजाचे सेवन केले असले बाबत अहवाल रुग्णालयाने दिला.या चारही इसमांचे विरुद्ध एन.डी.पी.एस.कायदा कलम ৪(क),27 प्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खेरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरीक्षक/ प्रविण पाटील,पोहेकॉ/तनवीर शेख,पोहेकॉ/रवींद्र टकले, पोहेकॉ/शाहीद शेख,पोहेकॉ/ संदिप पितळे,पोना/अविनाश वाकचौरे,पोकॉ/दिपक रोहकले,पोकॉ/तान्हाजी पवार,पोकॉ/सत्यजित शिंदे, पोकॉ/सुरज कदम,पोकॉ/ अभय कदम,पोकॉ/प्रमोद लहारे,पोकॉ/शिवाजी मोरे, पोकॉ/अतुल काजळे,पोकॉ/महेश पवार,पोकॉ/सुजय हिवाळे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page