फी अभावी बारावीच्या परीक्षा फॉर्म न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव विलंब फी माफ करण्यात यावी आप शिक्षक आघाडीचे थेट राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांना निवेदन
पुणे प्रतिनिधी:-विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम असणाऱ्या आम आदमी पार्टीच्या शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्षा शितल कांडेलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अध्यक्ष शरद गोसावी यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,फी अभावी बारावीचा परीक्षा फॉर्म न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव विलंब फी माफ करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन घेऊन थेट राज्य मंडळ अध्यक्ष श्री.शरद गोसावी यांच्याशी जवळपास तीस मिनिटे बारावी बोर्ड व फी माफी यावर चर्चा केली. महाराष्ट्रातील १२ वी परीक्षा देऊ इच्छित विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी.
तसेच महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहता कामा नये असे निवेदन शिक्षक आघाडी कडून देण्यात आले.यावेळी शिक्षक आघाडी अध्यक्षा शितल कांडेलकर,केतन फडके उपाध्यक्ष शिक्षक आघाडी, श्रद्धा शेट्टी महिला आघाडी उपाध्यक्ष,आप सदस्य फुलचंद मस्के व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.