
अहमदनगर (दि.१५ फेब्रुवारी):-संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने दि.14 फेब्रुवारी रोजी महामंडळाच्या योजनाचा प्रचार प्रसार कार्यशाळेचे आयोजन भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह सावेडी बस स्थानकाजवळ करण्यात आले होते.
या कार्यक्रमात चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी मागणी केली की,महाराष्ट्र मध्ये शेतकरी राजा संकटात असताना राज्य सरकारने अनेकदा अनेक मोठ्या उद्योजकांना केंद्र सरकारने व राज्य सरकारने कर्जामध्ये माफी दिलेली आहे.चर्मकार समाज सुद्धा हातावर पोट असणारा समाज आहे.कोविडच्या काळामध्ये समाजातील सर्व बांधवांना त्रास झालेला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने चर्मकार बांधवांचे कर्ज त्वरित माफ केले पाहिजे ही समाजाची भावना आहे.त्याच प्रमाणे चर्मोद्योग महामंडळाला अहमदनगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची आवश्यकता आहे.आज महामंडळात एकच अधिकारी दोन जिल्ह्याचे काम (अहमदनगर आणि नाशिक) जिल्ह्याचे पाहत आहे त्यामुळे समाज बांधवांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे.तसेच महामंडळासाठी महाराष्ट्र सरकारने 300 कोटीची हमी घेतलेली आहे. ती एक हजार कोटी घ्यावी अशी समाजाची मागणी आहे.