
पारनेर (प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायती मधील नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शेजारी असणारे भरत गट यांनी कट्टा हिसकवल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
पारनेर येथील हॉटेल दिग्विजय येथे ही घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते. पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपी तरुणास ताब्यात घेतले आहे.अधिक तपास पोलिस करत आहेत.