अहमदनगर दि.१४ फेब्रुवारी:-अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी यातील मुख्य आरोपी सीए.शंकर अंदानी याला नगर शहरातील त्याच्या ऑफिस मधून आज रात्री उशिरा अटक केली आहे.
अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील सीए ला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याने तपासाला योग्य दिशा मिळाली आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे नव्याने पदभार घेतलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
नगर अर्बन बँकेच्या 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्या संदर्भात चौथा आरोपी अटक झाला असून या आधी देखील तीन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. डी वायएसपी संदीप मिटके यांनी पदभार घेतल्यापासून बँकेच्या ठेवीदारांना मिटके यांच्याकडून फार अपेक्षा आहेत त्यामुळे संदीप मिटके यांनी आधी सर्व बँकेच्या केसची तपासणी करून मग आता कारवाई करण्यास सुरुवात केल्याने आता तपासाला अधिक गती मिळून ठेवीदारांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.