पाथर्डी (विठ्ठल आंधळे):-अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरेवाडीने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत जिरेवाडी शाळेने खो-खो क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला,तसेच कबड्डी मध्ये मुलांच्या लहान गटाने दुसरा क्रमांक पटकावला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे गटविकास अधिकारी कांबळे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार,विस्तार अधिकारी भांगरे,केंद्रप्रमुख बागडे, जिरेवाडी गावचे सरपंच सौ.लक्ष्मीताई आंधळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय आंधळे या सर्वांचे विशेष शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल आंधळे यांनी आभार मानले.
सर्व विजयी विद्यार्थ्यांची पारंपारिक वाद्याने गावात मिरवणूक काढली.या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली.यावेळी उद्धव आंधळे, गणेश आंधळे,बाळासाहेब आंधळे,आजिनाथ आंधळे,मुकुंद आंधळे यांच्या सह सर्व ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केली. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सौ. ढाकणे मॅडम,क्रीडा शिक्षक श्री.साळुंके सर,सहशिक्षक श्री.दहिफळे सर तसेच मोहटादेवी येथील क्रीडा शिक्षक श्री.दहिफळे सर यांचे विशेष अभिनंदन मानले.