अहमदनगर (दि.१४ फेब्रुवारी):-सारसनगर भागात धारदार तलवार बाळगणा-या विरुध्द भिंगार कॅम्प पोलीसांनी मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी की,भिंगार पोलीस स्टेशनचे सपोनि/योगेश राजगुरू यांना गोपनिय माहीती मिळठालीकी,त्रिमुती चौक, सारसनगर भागात एक इसम हातात धारदार तलवार अवैध्यरित्या घेऊन दहशत करीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने सपोनी/ राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.लागलीच
तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा रचुन सदर इसम हा दहशत करित असताना त्याच्या हातातील धारदार तलवार शिताफीने ताब्यात घेऊन सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव भगवान उर्फ शुभम रघुनारथ गोल्हार (रा. त्रिमुर्ती चोक,सारसनगर) असे असल्याचे सांगीतल्याने सदर इसमाविरुद्ध कॅम्प पोस्टे गुरंन 127/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खेरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी योगेश राजगुरु यांच्या सूचनेनसार सफो/रेवननाथ दहिफळे,पोहेकॉ/दिपक शिंदे, पोहेकॉ/मिसाळ,पोहेकॉ/संदिप घोड़के,पोकॉ/समीर शेख,पोकॉ/थोरात,पोकॉ/ अमोल आव्हाड,चापोकॉ/लगड़ यांनी केली आहे.