Maharashtra247

ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेची गंभीर दखल घेणे गरजेचे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर

अहमदनगर (दि.२२ फेब्रुवारी):-सोनई येथे पास्टर सुनिल गंगावणे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर दि.२१ फेब्रुवारी रोजी नगर येथे आले होते.

या घटनेची माहिती जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी दिली त्या प्रमाणे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी पास्टर सुनिल गंगावणे यांच्या पत्नी शैलजा सिस्टर व त्यांच्या मुलाची भेट घेतली या वेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण सर,दिशा पिंकी शेख,जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,शहर अध्यक्ष हनिफ शेख,शहर महासचिव अमर निरभवणे,आदींनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली व चर्चा केली या वेळी योग्य तपास करुन दोषीवर कडक करवाई करावी पण दोषी नसल्यास गुन्ह्यातून वगळावे अशा सूचना ॲड.आंबेडकर यांनी प्रशासनास केल्या या वेळी ख्रिश्चन समाजातील युवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते सर्वांनी संकटात आधार दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page