Maharashtra247

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल ४७२ रूग्णांना मिळाला मोफत वैद्यकीय उपचार 

संगमनेर (बानोबी शेख):-आत्मा मलिक हॉस्पिटल आणि ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करताना माणूस जन्म मिळाला आणि त्या माणूस जन्माचे सार्थक होण्यासाठी तसेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून लोका भिमुख संकल्पना आणि त्याच संकल्पनेचा वसा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातून शिबिर भरवावं ही संकल्पना ह्युमन इनोव्हेशन ओर्गनाइझेशनच्या संस्थापक अध्यक्ष गुड्डु भाई सय्यद यांना सुचली त्यानुसार जिल्हा पदाधिकारी यांनी आत्मा मालिक हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शाहनवाज शहा यांच्याशी संपर्क साधत पुढील नियोजन करण्यात सुरुवात केली.

शिबीराचे आयोजन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तच शिबीराचे आयोजन करावे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना अठरा पगड जाती जमाती एकत्र येऊन साजरी झाली पाहिजे कारण राजे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते,त्याच बरोबर आपल्याला मदत करणारे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिका हॉस्पिटल यांचा देखील उद्देश तोच आहे आणि आपली संस्था देखील मानवांच्या आधीकारा करीता काम करत असते मग आपन ही या संधीच सोन करू आणि या शिबीराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेची खरी सेवा घडवू म्हणून संस्थापक अध्यक्ष गुड्डु भाई यांनी हे आरोग्य शिबिर घेण्याचे ठरविले.सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत असल्यामुळे आयुष्य जगण्याकडे दुर्लक्ष होत चालले असल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.नागरिकांनी सतत आनंदी राहणे हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. संगमनेर मधे यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार यांच्या व आत्मा मालिक हॉस्पिटल च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन अग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन गणी हाजी शेख यांच्या हस्ते करण्यात आले होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.संग्राम जोंधळे हे होते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करत सर्व रोग निदान शिबिराला सुरुवात झाली. शिबीराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असुन संगमनेर शहर व तालुक्यातील विविध आजारांवरील एकुण ४७२ रुग्णांना मोफत वैद्यकीय लाभ मिळाला आहे.

काही रूग्णांना मोफत मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी जंगली महाराज आश्रम संचलित आत्मा मालिक हॉस्पिटल मधे दाखल केले आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र अल्पसंख्यां ख्रिस्ती विकास परिषदेचे अनिल भोसले व अफसर भाई तांबोळी यांनी केले तर उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन मा गणीहाजी शेख आत्मा मालिक हॉस्पिटलचे मुख्याधिकारी कार्यकारी नितीन पाटील,ह्युमन इनोव्हेशन चे संस्थापक अध्यक्ष गुड्डु भाई सय्यद, महाराष्ट्र प्रदेश सचिव रफिक सय्यद,संघर्ष सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲड.संग्राम जोंधळे,उ.बा.ठाकरे गट शिवसेनेचे रविंद्र उर्फ पप्पू कानकाटे,डॉ.जे.पी. शेख,निमा संघटनेचे डॉ. एजाज शेख,डॉ.शाकीब बागवान,डॉ.ताज तांबोळी,डॉ. इर्शाद पठाण,ॲड.अझहर सय्यद,ॲड.बबलू शेख,डॉ.जावेद युनूस शेख, एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते राजुभाई इनामदार,माजी नगरसेवक नुमहंमद शेख,माजी नगरसेवक डॉ.दानिश खान, माजी नगरसेवक हबीब बाबू शेख,माजी नगरसेवक लाला अहमद बेपारी,यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे,मुस्लिम सेवा संघाचे नाशिक जिल्हा सचिव तथा अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अफसर तांबोळी,अमृतवाहिनी बँकेचे संचालक उबेद शेख, कॉग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जावेद शेख,रिजवान शेख,जलिल शेख,तौफीक बागवान,शिवसैनिक मुस्लिम मावळा अझीझ मोमीन, सामाजिक कार्यकर्ते मुझंमिल उर्फ गुड्डू शेख,सिनेअभिनेता राजन झवर,माजिद खान आदी मान्यवर उपस्थित होते.

तर शिबीर आयोजित करत असताना व जास्तीत जास्त गरजूंना याचा लाभ मिळावा यासाठी विषेशता ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकारच्या अहमदनगर महीला जिल्हा अध्यक्षा बानोबी शेख, अहमदनगर जिल्हा जनसंपर्क अधिकारी रेश्मा शेख,संगमनेर तालुका अध्यक्षा सविता भालेराव,संगमनेर शहर अध्यक्षा आरती सोनवणे, ज्योती पंधारे,मंगल आंधळे,सुरेखा सोनवणे,मुस्कान शेख,शाहीन शेख,आसमा शेख,दिलशाद शेख,तस्लिम शेख,सानिया शेख यांनी घरोघरी जाऊन शिबीराचे पॉम्पलेट वाटप करून तसेच रुग्णांना सेवा देण्याचे काम केले.तर शिबीर यशस्वी रित्या पार पडावा गरजुंपर्यंत माहिती मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशरफ भाई जहागिरदार, दत्तात्रय इटप,मा.शिवसेना शहरप्रमुख अमर भाऊ कतारी,रविंद्र उर्फ पप्पू कानकाटे,मा.नगरसेवक आरिफ देशमुख,दैनिक प्रवरा तिरचे संपादक धिरजसिह ठाकुर,दैनिक रोकठोक सार्वभौमचे मुख्यसंपादक सागर शिंदे,सहसंपादक सुशांत पावसे,राजसत्ता न्यूजचे संपादक सहदेव जाधव,मा.नगरसेवक किशोर बद्रीनारायण टोकसे, सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख,युनिक प्रोपर्टीचे मुजाहीद पठाण,ॲड.शरीफ पठाण, सामाजिक कार्यकर्ते संजय पगडाल यांनी जाहिरातीचे सर्व काम पार पाडले.ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार अहमदनगर जिल्हा महासचिव जमिर शेख उर्फ बब्बू पाकीजा,संगमनेर तालुका अध्यक्ष युसुफ शेख,संगमनेर शहर अध्यक्ष सलमान शेख, संगमनेर तालुका कार्याध्यक्ष परवेज बेपारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष मांन्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले तर कार्यक्रमाची खरी शोभा दोन लहान चिमुकल्यांनी माता जिजाऊ आणि शिवबाची वेशभूषा करून वाढवीली होती तर कार्यक्रमाच्या शेवटी ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशनचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पत्रकार शौकत पठाण यांनी उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे व मोफत शिबीर घेणार्या आत्मा मालिक हॉस्पिटल च्या सर्व डॉक्टर्स नर्सेस स्टाफचे आभार मानले

You cannot copy content of this page