Maharashtra247

यशस्वी लढ्यानंतर पारनेर तहसिलवरील उपोषण सातव्या दिवशी सुटले;पारनेर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांची यशस्वी मध्यस्थी

पारनेर (प्रतिनिधी):-पारनेर तहसिलवर १५ फेब्रुवारी पासुन शेतकऱ्यांनी शेतरस्त्यांसाठी सुरू केलेल्या चले जाव आंदोलनाची सातव्या दिवसापर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही.

शेतकऱ्यांची प्रकृती ढासळत चालली असताना आरोग्य विभागाकडूनही योग्य उपचार मिळत नव्हता त्यामुळे महाराष्ट्र शिवपाणंद शेवरस्ता चळवळीचे शरद पवळे यांनी तातडीने २२ तारेखला तहसिलकार्यालया समोरील पारनेर रोड बंद रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसिल कार्यालया दिल्यानंतर पारनेरचे पोलिस निरिक्षक समीर बारवकर यांनी तातडीने पारनेरच्या तहसिलदार गायत्री सौंदाणे यांच्याशी संपर्क साधत शेतकरी तहसिल प्रशासन यांचा समन्वय घडवत चर्चा घडवून आणत मध्यस्थिची भूमिका पार पाडली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पारनेर तहसिलवर झालेल्या चर्चेनंतर तहसिलदारांनी शासन निर्णय व मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठ यांचेकडील आदेशान्वये संदर्भ देत गटविकास अधिकारी पंचायत समिती पारनेर यांनी ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रत्येक ग्रांपचापत निहाय/ शेत पाणंद शिव रस्ते प्रलंबित असणारे याबाबतची आराखडा ग्रामविकास अधिकारी यांनी ७ दिवसात सादर करणे बाबत ग्रामविकास अधिकारी यांना आपल्या स्तरावरून सुचना द्याव्यात व सदर बाबत मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठ,औरंगाबाद खंडपिठ, औरंगाबाद यांचे कडील रिट पिटीशन नंबर ८२४७/२०२३ रोजी आदेशाचा अवमान होणार याबाबत दक्षता घ्यावी तसेच आजपावेतो आपण एकही प्रस्ताव सादर केलेला नाही.

तरी आपण तात्काळ प्रस्ताव सादर करण्याची दक्षता घ्यावी असे लेखी पत्र दिले त्याच बरोबर उपअधिक्षक भुमी अभिलेख, पारनेर यांनी पारनेर तालुक्यातील शेत पानंद रस्ते अंतर्गत येणारे शिवरस्ते मोकळे करणे कामी पारनेर तालुक्यातील सर्व शिवरस्ते व पाणंद यांची माजणी होणे आवश्यक आहे.सदर मोजणी झालेनंतर हद्दी खुणा निश्चीती केलेनंतर सदर अतिक्रमीत शेत पानंद रस्ते व शिवरस्ते या कार्यालयाकडून खुले करता येतील मा.उच्च न्यायलय औरंगाबाद खंडपिठाच्या आशान्वये पारनेर तालुक्यातील सर्व शिवरस्ते व पाणंद यांची मोजणी करून अहवाल तात्काळ इकडेस सादर करावा व मा.उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी शारून निर्णयानुसार सदरची मोजणी करीता कोणतेही शुल्क आकारण्यात येवुन ये ही मोजणी तातडीची मोजणी म्हणून करण्यात यावी असे सुचित करण्यात आले व पारनेर तालुक्यात साधारणतः ७५० ते ८०० प्रलंबित रस्त्याची प्रकरणे होती प्रलंबित प्रकरणापैकी ६ महिन्यांत ८० ते ९० प्रकरणांमध्ये आदेश पारीत करणेत आलेला आहे तसेच मा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर अधिकारी यांचे संकल्पनेतून रस्ता प्रकरणी तात्काळ निर्गत करण्याच्या दृष्टिने ‘जनन्याय दिन’ हे अभियान राबवण्यात येत असुन त्याअंतर्गत दर बुधवारी सर्व नायब तहसिलदार व तहसिलदार हे प्रलंबित रस्ता प्रकरणांचे स्थळपरिक्षण करत आहेत.

अशा विविध मागण्यांच्या तहसिलदारांच्या लेखी आश्वासनानंतर २१ फेब्रुवारीला महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन व रामदास लोणकर,भाऊसाहेब बाळूंज,संजय साबळे,बबन गुंड, बबन मावळे यांचे सुरू असलेले उपोषण निवासी नायब तहसिलदार गणेश आढारी,नायब तहसिलदार सुभाष कदम यांसमवेत पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते नारळ पाणी देत सोडण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे सर्वांचे मनापासून आभार मानले आंदोलनस्थळी सरपंच अशोक वाळूंज काकणेवाडी,दिपक खंदारे,योगेश वाळूंज,गंगाधर वाळूंज, पंढरिनाथ गाडगे,रामचंद्र पवार,संदिप मावळे,सुभाष शेळके,संतोष लोणकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page