बालकांचे संरक्षण आणि बालविवाह रोखण्यासाठी ग्रामबाल संरक्षण समितीची स्थापना…स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाह आणि बालकांचे अधिकारा विषयी बुऱ्हानगर गावात जनजागृती कार्यक्रम संपन्न…
अहमदनगर (दि.२२ फेब्रुवारी):-दि.२१ फेब्रुवारी रोजी बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुऱ्हानगर,येथे बालविवाह जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी उडान प्रकल्पाची माहिती देऊन बालविवाहाचे दुष्परिणाम व त्याला कारणीभूत असणारे घटक यांची माहिती दिली.
बालविवाहांचे प्रमाण भारतात ४७,तर महाराष्ट्रात ३५ टक्के आहे. बालविवाहांमुळे मातामृत्यू, गर्भपात, कुपोषित अर्भके,याच बरोबर स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणा संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत.अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये बालविवाह झालेल्या मुलींचे प्रमाण खूप मोठे आहे.शिक्षण आणि आरोग्याचे उद्दिष्ट जर १०० टक्के साध्य करायचे असेल,तर बालविवाहाचे प्रमाण शून्य टक्के करण्यासाठी उडान प्रकल्प प्रयत्नशील आहे.
त्याचबरोबर गावात बाल संरक्षण समितीची ही नेमणूक करण्यात आली. व शाळेतील दोन मुली व दोन मुले असे बाल संरक्षण समितीसाठी निवडण्यात आले .या वेळी उपस्थित विद्यालय चे प्राचार्य काशिनाथ हापसे सर, उपप्राचार्य शेळके सर, बुऱ्हानगर या गावचे उपसरपंच जालिंदर जाधव, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी कराळे भाऊसाहेब ,ज्येष्ठ नागरिक पानसरे दगडू मामा ,ज्येष्ठ नागरिक शिंदे नितीन त्याचबरोबर बानेश्वर विद्यालयाचे शिक्षक वृंद हे प्रमुख उपस्थितीत होते. तसेच उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर शाहिद शेख, शशिकांत शिंदे, पूजा झिने, सीमा जुनी यांनी जनजागृती कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.
आपली विश्वासू कु.पूजा झिने सोशल वर्कर
उडान प्रकल्प,अहमदनगर 9011026495