अहमदनगर (दि.२१ फेब्रुवारी):-मोपेड मोटरसायकलच्या डीक्कीत धारदार कोयता बाळगणा-या तरुणास भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई करत जेरबंद केले आहे.
दि.२१ फेब्रुवारी रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे मोबाईल नं 1 वरिल अंमलदार भिंगार परिसरात पेट्रोलींग करत असताना कॅन्टोनमेंट बोर्ड,शाळा भिंगार भागात एक इसम संशयीत रित्या मोपेड मोटारसायकल वर फिरताना मिळून आला त्यास थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने उड़वाउडविचे उत्तरे दिली असता त्याच्या मोपेड मोटार साईकलची तपासणी केली असता त्याचे मो/सा चे डिक्कीत एक धारदार लोखंडी कोयता मिळुन आला त्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक अशोक गोराडे (रा. श्रेयश पार्क,माधवबाग आलमगीर ता.जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगीतल्याने सदर इसमा विरुद्ध भिंगार कॅम्प पोस्टे येथे गुरंन 159/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्रू पोलीस अधिनियम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी/योगेश राजगुरू,पोहेकॉ/दिपक शिंदे, पोहेकॉ/पठाण,पोहेकॉ/मिसाळ,पोकॉ/समीर शेख,पोकॉ/सागर तावरे यांनी केली आहे.