अहमदनगर (दि.९ ऑगस्ट):-जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात एक खळबळ जनक घटना समोर आली आहे.येथील उक्कडगाव शिवारातून एक १० वर्षे वयाचा मुलगा शाळेत जात असताना घोयेगाव ते उक्कडगाव रोडवर राहणाऱ्या अशोक बाबुराव शिंदे यांच्या घराच्या पुढे दोन मोटारसायकलींवर आलेल्या इसमांनी या मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
ही बाब उघडकीस आल्यावर या दोघा आरोपींना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला.असलम अजमेर पठाण,शरीफखान मस्तानखान पठाण (दोघेही रा. कठोरा बाजार,ता.भोकरदन,जि.जालना) अशी नावे आहेत.त्यांच्या कडून एक मोटारसायकल जप्त केली आहे.
मुलाचे वडील उत्तम विष्णू निकम (रा. उक्कडगाव,ता. कोपरगाव) यांनी या बाबत फिर्याद दिली की, काल गुरूवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास १० वर्षांचा मुलगा शाळेत जाण्यासाठी घोयेगाव ते उक्कडगाव रोडने जात असताना आरोपी मोटारसायकलवर आले व मुलाला म्हणाले,बेटा इधर आओ,हमारे साथ गाडी पर बैठो,तुझे स्कूल में छोड देते है,असे म्हणून त्यास पळवून नेण्याचा प्रयत्न करू लागले;मात्र ही बाब निकम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांसह त्यांचा पाठलाग केला.तेव्हा आरोपी मक्याच्या शेतात लपले,त्यांना शोधून काढत चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोटारसायकल जप्त केली आहे.त्यामुळे उक्कडगाव व आजूबाजूच्या परिसरात या प्रकाराने घबराटीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पालकांनी मुलांवर शाळेत जाताना लक्ष ठेवले पाहिजे त्यामुळे अशा घटना पुन्हा होणार नाही.
