श्रीरामपूर प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे शेती महामंडळाची ४३ एकर जमीन बेलापूर बु ग्रामपंचायतीस विनामूल्य देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाने घेतला होता.सदर जमिनीच्या ७/१२ वाटपाचा कार्यक्रम मंत्री श्री.विखे पाटील लहस्ते श्रीरामपूर येथे पार पडला.
यावेळी बेलापूर बु-ऐनतपूर ग्रामस्थांच्या वतीने नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांची पुस्तकतुला करण्यात आली.यासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच स्वाती अमोलिक,उपसरपंच मुस्ताक शेख,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.४३ एकर जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची झाल्यामुळे १२०० नागरिकांची घरकुले,जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेचा साठवण,तलाव,शाळा,अंगणवाड्या,क्रिडांगण,घनकचरा प्रकल्प,हिंदू स्मशानभूमी,मुस्लिम कब्रस्तान,आदिवासी दफनभूमी आदि प्रश्न मार्गी लागणार आहेत.
