अहमदनगर (प्रतिनिधी)-समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अहमदनगर शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून भव्य असा जिल्हा व्यापी संविधान सन्मान महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा माऊली संकुल येथे २६ ऑगस्ट रोजी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात येणार असून यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच आ.शिवाजीराव गरजे,आ.अमित गोरखे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने सत्कार समारंभ देखील आयोजित केलेला आहे.
या मेळाव्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर,राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप कवाडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.तरी सर्व समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड,उत्तर महाराष्ट्र सचिव आरपीआय (आ) अजय साळवे,आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,,ज्येष्ठ नेते नितिन कसबेकर आदींनी केले.
तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात विरोधकांनी संविधानाविषयी व संविधान बदलण्याचा अपप्रचार महायुतीच्या विरोधात केलेला होता त्यास प्रत्युत्तर म्हणून ही या मेळावाचे आयोजन करण्यात आले असून संविधान बदलण्याची ताकद अद्याप कोणालाच नसल्याची ग्वाही या महामेळाव्यात देण्यात येणार असल्याची भावना यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
