अहमदनगर (दि.१२ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु,पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन 3 लाख 37 हजार 815/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि.11 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेशाने नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी पाथर्डी पोलीस स्टेशन हददीत खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,इसम नामे शिवाजी बटुळे हा त्याचे वैगनर कार एम.एच.12 क्यु.ड्ब्लु.2162 मधे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ पानमसाला गुटखा त्याची चोरटी विक्री करण्याकरीता खरवंडी कासार वरुन पाथर्डीकडे येत आहे.
अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोनि.श्री.आहेर यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंगवर असणाऱ्या पथकातील पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाट,पोहेकॉ/1372 संतोश शंकर लोढे,पोकॉ/435 बाळु सुभाष खेडकर,सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कार्यवाही करणेबाबत तोंडी आदेश दिल्याने वरील नमुद पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनाने वेताळबाबा मंदीराजवळ जावुन थाबले असता त्यांना खरवंडी रोडकडुन एक वैगनर कार एम.एच.12 क्यु.ड्ब्लु.2162 ही येताना दिसली तेंव्हा पोलीस पथकाची खात्री होताच त्यास थांबवुन पोलीस व पंचांची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शिवाजी मारुती बटुळे (रा.भारजवाडी ता.पाथर्डी जि.अहमदगनर) असे सांगितले.त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ पानमसाला गुटखा मिळुन आला त्यांना सदरचा माल कोठुन आणला याबाबत विचारपुस केली असता त्याने मी सदरचा माल हा मी परवेज नवाब शेख राहणार श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर व संजय खोले (पूर्ण नाव माहीत नाही) राहणार-बोधेगाव ता.शेवगाव जिल्हा-अहमदनगर यांचे कडुन आणलेला असले बाबत सांगितले.
वरील मुददेमाल व आरोपीस ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाट,पोहेकॉ / 1372 संतोश शंकर लोढे, पोकॉ/435 बाळु सुभाष खेडकर,सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने केली.
