जालना प्रतिनिधी (दि.१२ ऑगस्ट):-जालना पोलीस दलातील व कदीम पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री.दिलीप बी. गायकवाड यांना जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

कदिम पोलीस ठाण्यातील गु.र.क्र.२२१/२०२४ ३९४,३४ गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यातील दोन आरोपींनी संगणमत करून रिक्षावाल्यास थांबवून १०० ते २०० रुपयांची मागणी केली होती.फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी फिर्यादीस धारदार कोयत्याने वार करून जखमी केले होते.
या गुन्ह्यात तपासी अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत मेहनतीने व सीताफीने परिश्रम करून आरोपीस अवघ्या ७२ तासात गजाआड केले. हि कामगिरी अतिशय उल्लेखनीय व वाखाण्याजोगी बाब आहे आणि ही कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे यामुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली गेलेली आहे या शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बंसल यांनी पोलीस अंमलदार दिलीप गायकवाड यांना प्रशस्तीपत्रक दिले.
