येडशी प्रतिनिधी(संतोष खुणे):-येडशी येथील जनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी भारत देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवल्या.
“रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे.या निमित्त चायना बॉर्डर वरील जवानांसाठी राख्या बनविण्याचा कार्यक्रम विद्यालयात राबविण्यात आला.
या मध्ये विद्यालयातील विध्यार्थीनिंनी स्वयंम प्रेरेनेने मोठ्या उत्साहाने भाग घेतला.या कार्यक्रमा निमित्त कु.प्रतीक्षा दिवाने,देशमुख मॅडम, प्राचार्य नलावडे सर यांनी या कार्यक्रमाचे महत्व आपल्या भाषणा तुन सांगितले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री.चव्हाण सर,देशमुख मॅडम,पाडुलकर मॅडम, भोजने मॅडम,माने मॅडम, आमले मॅडम,इंगळे मॅडम,सवणे मॅडम,तांबे मॅडम,देशमुख मॅडम,रणदिवे मॅडम बनसोडे मॅडम,शिनगारे मॅडम इ.नी परिश्रम घेतले व यशस्वी रित्या कार्यक्रम पार पाडला.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्रा.नलावडे सर,उपप्रा कांबळे सर, पर्यवेक्षक श्री.चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
