स्थानिक गुन्हे शाखेचा तपोवनरोड वर सापळा दोघांकडून गावठी कट्टा जप्त
अहिल्यानगर (दि.२९ प्रतिनिधी):-अहिल्यानगर येथे गावठी कट्टा बाळगणारे 2 इसम 7 लाख 31,000/-रू. किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती घेताना दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी पोनि/श्री.आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम हुंडाई कंपनीचे व्हेरना क्रमांक एमएम-14-ईसी-9791 हिचे मधुन गावठी कट्टयाची विक्री करण्यासाठी तपोवन रोड,अहिल्यानगर येथे येणार असलेबाबत माहिती मिळाली.पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले,गणेश भिंगारदे,फुरकान शेख,प्रशांत राठोड,महादेव भांड व संदीप पवार नेम.तपास पथक अशांचे पथक तयार करून संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
तपास पथकाने तपोवन रोड, अहिल्यानगर परिसरात संशयीत वाहनाचा शोध घेत असताना गायकवाड हॉस्पीटल,तपोवन रोड, अहिल्यानगर येथे बातमीतील नमूद कार मिळाल्याने,कार थांबवून त्यामधील दोन इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मुदस्सर सादीक सय्यद, वय 20,रा.सरकारी दवाखान्याजवळ, पाथर्डी,ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर,विनोद विजय वाघमारे,वय 19, रा.गोकुळ कॉलनी, राहुरी,जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल, 1000/- रुपये किंमतीचे 1 काडतुस व 7,00,000/- रू किंमतीची हुंडाई कंपनीची व्हेरना कार असा एकुण 7,31,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.नमूद आरोपीविरूध्द पोना/658 संदीप संजय दरंदले,नेम.स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1186/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.