सुपा प्रतिनिधी:-सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे नारायणगव्हाणच्या चौपदरीकरणासाठी मोजणीचे शुल्क तातडीने जमा करूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही.नारायणगव्हाणकरांसह प्रवाशांचा महामार्गावर प्रवास अत्यंत जीवघेणा बनला असून वेळोवेळी प्रत्येक प्रशासकीय विभागाला पाठपुरावा करत गावच्या संवेदनशीलतेची प्रशासनाला जाणीव करून दिली असून प्रशासनाकडून दिरंगाई होत असून नारायणगव्हाणकरांनी सुरुवातीपासून प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवली असून प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने काम करताना दिसत नसून प्रशासनाकडून होणारा जीवघेणा निष्काळजीपणा घातक असून प्रशासणाला जाग करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके यांनी निवेदन देत रास्ता रोको,धरणे आंदोलन उपोषण यांसह पारनेर तहसिल कार्यालयावर लोटांगन आंदोलन केले परंतु या आंदोलनाकडे तहसिलदारांनी,प्रशासनाने जाणीपूर्वक पाठ फिरवली दिवसेंदिवस महामार्गावर गाड्यांची वाढती संख्या व अरुंद रस्ता यामुळे दळणवळचा वाढता धोका जीवघेणा निर्माण झाल्यामुळे नाईलाजास्तव पुन्हा नव्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासमोर परिस्थितिचे गांभिर्य समोर ठेवत विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांसह प्रवाशांची महामार्गावरील होणारी जीवघेणी कसरत थांबवण्यासाठी नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे काम सुरू करा अन्यथा २० जानेवारीला म्हसणे फाट्यावर नारायणगव्हाण ग्रामसुरक्षेसाठी”टोल बंद”पत्रक वितरण आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.