प्रेमसंबंधातुन झालेल्या खुनातील आरोपी अखेर जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शेवगांव येथील प्रेमसंबंधातुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथुन जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.12 ऑगस्ट 2025 रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी गांवच्या शिवारात गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे 30 वर्षे वयाचे अनोळखी प्रेत मिळुन आलेले होते.सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 720/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे तक्रारदार श्री.राहुल पुंडलिंक औताडे (रा. कोलठाणवाडी रोड,शिवनेरी कॉलनी,हार्सुल,छ.संभाजीनगर) यांचे तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे.सदर खुनाचे गुन्ह्यातील आरोपी नामे दुर्गेश मदन तिवारी रा. वडोद, (कान्होबा), ता. खुलताबाद,जि.छ.संभाजीनगर, भारती रविंद्र दुबे रा.फ्लॅट नं. 201,एस. एस.मोबाईल शॉपी जवळ, कॅनोट प्लेस सिडको,जि. छ.संभाजीनगर यांना दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी ताब्यात घेण्यात आलेले होते.

परंतु त्यांचा साथीदार अफरोज खान पुर्ण नांव माहित नाही (रा.खटखट गेट,ता.जि.छ.संभाजीनगर) गुन्हा घडल्यापासुन फरार झालेला होता.सदर फरार आरोपीचा शोध घेणेकामी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील फरार आरोपी नामे अफरोज याची माहिती काढुन त्याचे पुर्ण नांव निष्प्पन्न केले.दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी सदर आरोपीचा शोध घेत असतांना तो प्रवरासंगम या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदार व व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती प्राप्त झाली.
पथकाने प्रवरासंगम या ठिकाणी जावुन सापळा रचुन अफरोज सुलतान खान (वय 45 वर्षे रा.कटकटगेट ता.जि.छ.संभाजीनगर) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे यापुर्वी गुन्ह्यामध्ये अटक केलेले साथीदार यांचे सोबत गुन्हा केल्याचे कळविले आहे.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ,बाळासाहेब खेडकर,रमिझराजा आतार, सारिका दरेकर,भगवान धुळे यांनी केलेली आहे.