शहरातील घोडेपीर दर्गा समाजकंटकांकडून पाडण्याचा प्रयत्न..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न झाला आहे.रविवारी (ता.24 ऑगस्ट) रोजी पहाटे अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.खरे तर हा दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जात होता.

मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यावरून वाद सुरू होते.रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कोतवाली पोलीस ठाणे व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी तेथे धाव घेतली. पडलेला भाग हटविण्यात येऊन उरलेला भाग झाकून ठेवण्यात आला आहे.पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.