गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर..गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे प्रयत्न चालू आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली.काल शुक्रवार दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शहरातील सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जिल्हा पोलीस मुख्यालय येथे बोलावून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मंडळात काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत सूचना केल्या.तसेच आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये पोलीस बंदोबस्ता बाबतीत माहिती दिली दोन अप्पर पोलीस अधीक्षक,सात पोलीस उपाधीक्षक,तीन पोलीस कर्मचारी,होमगार्ड असा पोलिसांचा बंदोबस्त असेल तसेच महानगरपालिका व महावितरण अधिकाऱ्यांना सूचना करून शहरातील अपूर्ण रस्त्यांची कामे यावर मनपाने उपाययोजना कराव्यात व तसेच अडथळा ठरणाऱ्या विजेच्या तारा व पोल या संदर्भात उचित कारवाई करावी यासंदर्भातही पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सूचना दिल्या.
तसेच शहरातील गणेश मंडळांनी मंडळामध्ये निदान तीन ते चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले. समाजकंटकांवरही पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर वॉच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत 500 समाजकंटकांची यादी तयार केली असून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची लवकरच कारवाई केली जाणार असल्याची महानिरीक्षक कराळे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी इत्यादी उपस्थित होते.