गहाळ झालेल्या मोबाईलचा पोलिसांनी लावला तपास..मोबाईल दिले मुळ मालकांच्या ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जामखेड शहरात गहाळ झालेले मोबाईल शोधून मुळ मालकांचे ताब्यात देण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.बातमीतील माहीती अशी की, इसम नामे १)सुरज मानिक पवार,रा. कान्होपात्रागल्ली जामखेड, ता, जामखेड, २) कृष्णा शहाजी बोराटे, रा. बोराटेवस्ती जामखेड, ता. जामखेड, ३) अशोक सखाराम मॅदड, रा. अहिल्यानगर वस्ती जामखेड, ता. जामखेड, ४) नवनाथ विलास बिरंगळ, रा. सोनेगाव, ता. जामखेड, ५) अतुल सावता मोहळकर, रा. नान्नज, ता. जामखेड, ६) सुनिल रामा फुलमाळी, रा. नान्नज, ता. जामखेड, ७) सोनु कुंदन वाघमारे,रा.आरोळेवस्ती जामखेड, ता.जामखेड,जि. अहिल्यानगर अशा वरील लोकांचे त्यांचे मोबाईल गहाळ झालेबाबत जामखेड पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या होत्या, सदर तक्रारीच्या अनुषंघाने पोलीस निरीक्षक श्री दशरथ चौधरी,जामखेड पोलीस स्टेशन यांनी पथक तयार करुन तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे वरील इसमांचे गहाळ झालेले विविध कंपन्याचे मोबाईलचा शोध घेण्यात यश मिळाले असून सदर मिळालेले मोबाईल हे वरील मुळ मालक यांचे ताब्यात देण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रविणचंद्र लोखंडे कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दशरथ चौधरी, पोकॉ.देविदास पळसे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ.नितीन शिंदे यांनी केली आहे.