प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव उमेदवार परविन मनसूर सय्यद उतरणार रिंगणात..राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता
माजलगाव (प्रतिनिधी):- आझाद नगर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र.१३ महिला राखीव या मतदारसंघातून परविन मनसूर सय्यद या उमेदवार म्हणून पुढे येत असून,त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नागरिक,सामाजिक कार्यकर्ते आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.गेल्या १४ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारण करत असलेल्या परविन सय्यद यांनी समाजकारणातही ठसा उमटवला आहे.
रुग्णालयातील बाळ निराधार केंद्रातील सेवा असो,महिलांच्या निवारण केंद्रांतील मदतकार्य असो,किंवा पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित सामाजिक उपक्रम असोत — त्या नेहमीच महिलांच्या न्यायासाठी, समस्यांसाठी आणि सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतात.परविन सय्यद यांनी अनेकदा पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला असून,पक्षाच्या महिला आघाडीच्या उपक्रमांमध्ये नेतृत्वाची भूमिका निभावली आहे.समाजातील वंचित घटक, गरजू महिला,तसेच तरुणींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी विविध शिबिरे,जनजागृती मोहिमा आणि मार्गदर्शन उपक्रम राबवले आहेत.
महिला आरक्षणाच्या या निवडणुकीत प्रभाग क्र. १३ मधून त्यांनी उमेदवारी करण्याचा ठाम निश्चय केल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. “महिलांच्या प्रश्नांवर काम करणारी, जमिनीवर उतरून समस्यांकडे लक्ष देणारी व्यक्ती म्हणून परविन सय्यद या खऱ्या अर्थाने जनतेची उमेदवार आहेत,” असे नागरिकांनी सांगितले.त्यांच्या कार्यामुळे स्थानिक तरुणाई आणि महिला वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून, “सेवा हाच धर्म” ही भूमिका घेऊन त्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे असे त्यांनी सांगितले.