अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मद्यविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वाढ..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्य उत्पादन शुल्क विभाग,जि.अहिल्यानगर कार्यालयाच्या माध्यमातून दि.१ जानेवारी २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान अवैध मद्य निर्मिती,विक्री,भेसळयुक्त ताडी,हातभट्टी दारू, हॉटेल/ढाबे व परराज्यातील मद्य वाहतूक यासंदर्भातील कारवाई वेळोवेळी करण्यात आली आहे.
📊 कालावधीत कारवाईचा अहवाल
───────────────
| कालावधी | एकूण गुन्हे नोंद | अटक आरोपी | जप्त वाहने | जप्त मुद्देमाल (रुपये) |
|—————————|—————–|————|————|———————|
| 01/01/2025 – 30/09/2025 | 2289 | 2440 | 102 | 4,10,49,587 |
| 01/01/2024 – 30/09/2024 | 1820 | 1824 | 76 | 3,24,19,167 |
आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सुचनेनुसार दि.01 एप्रिल 2025 पासून अवैध धाबे व अनाधिकृत हॉटेलमध्ये विना परवाना मद्य विक्री विरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.
───────────────
📌 विशेष मोहिमेत कारवाईचा अहवाल
(01/04/2025 – 30/09/2025)
───────────────
| हॉटेल/धाबेवर गुन्हे नोंद | 556 |
| अटक आरोपी | 710 |
| कलम 68 व 84 अंतर्गत गुन्हे | 75 |
| जप्त मुद्देमाल (रुपये) | 15,41,121 |
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ९३ प्रमाणे १६९ प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात आली असून संबंधित आरोपींकडून 78,00,000/- रुपये बंधपत्र स्वरूपात घेतले गेले आहेत.बंधपत्र उल्लंघन प्रकरणे 10 आहेत.
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जि.अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,अवैध मद्याविषयी तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 📞 1800 233 9999 किंवा अधीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 📞 0241-2470860 वर संपर्क साधावा.