नगर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई..दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी मध्यरात्री पकडली
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुका पोलिसांचे पथक मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सात जणांच्या टोळीस पकडून त्यांना तुरुंगात डांबले आहे.या टोळीकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे चाकू,लोखंडी पहार,छन्नी,हातोडा,लाकडी दांडके,मारुती सुझुकी कंपनीचा कॅरी टेम्पो (क्र. एमएच १७, बीवाय ७६५६) तसेच मोबाईल असा एकूण ३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी ही कारवाई नगर-पुणे महामार्गावरील चास गावच्या शिवारात बंद पडलेल्या हॉटेल श्रेया जवळ २० ऑगस्ट रोजी केली आहे.या घाटात ड्रायव्हर लोकांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत व याबाबत अनेक निवेदनही ड्रायव्हर व नागरिकांनी दिलेले होते.परंतु नगर तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाई ने नागरिकांमध्ये आता समाधानाचे वातावरण झालेले आहे.सदरची कारवाई कारवाई नगर तालुका सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत घुमाळ, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड,दत्तात्रय हिंगडे, बाबासाहेब खेडकर,नितीन शिंदे, विक्रांत भालसिंग,चालक विठ्ठल गोरे व साठे यांनी केली आहे.