अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ जानेवारी):-औरंगाबाद वैजापूर येथील तक्रारदार यांच्या देशी दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयामार्फत पुढे पाठवायचा नसेल तर पन्नास हजार रुपये देण्याची मागणी रामेश्वर सिताराम काळे (वय 35 वर्ष,चापोकॉ,औरंगाबाद वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या गाडीवर चालक) यांनी केली होती.तर तडजोड अंती तीस हजारांच्या लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई हरीष खेडकर (पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि अहमदनगर,सहायक सापळा अधिकारी शरद गोर्डे, पो.नि.ला.प्र.वि.अहमदनगर,पोना/रमेश चौधरी,पोलीस अंमलदार/रविंद्र निमसे,बाबासाहेब कराड,चालक हारून शेख यांनी केली आहे.
